Home क्राईम महिलेचा विनयभंग; बोदवड येथे गुन्हा दाखल

महिलेचा विनयभंग; बोदवड येथे गुन्हा दाखल

0
30
FIR

बोदवड प्रतिनिधी । महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला मारहाण केल्या प्रकरणी बोदवड पोलीस स्थानकात एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील गाळेगाव येथील एक महिला ही आपल्या पतीसह बोदवड येथे किराणा घेण्यासाठी आली होती. किराणा घेतल्यानंतर हे दाम्पत्य मुक्ताईनगरकडे जाणार्‍या रिक्षा स्टॉपवर उभे होते. येथे नाडगाव येथील अशोक छगन प्रजापती या व्यक्तीने संबंधीत महिलेचा विनयभंग केला. याबाबत तिच्या पतीने अडविण्याचा प्रयत्न केला असता प्रजापती याने तिच्या पतीला देखील मारहाण केली.

या अनुषंगाने संबंधीत महिलेने बोदवड पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यानुसार अशोक छगन प्रजापती याच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


Protected Content

Play sound