Home Cities जळगाव साठेबहाद्दरांमुळे युरियाची कुत्रिम टंचाई ; खडसेंची कारवाईची मागणी

साठेबहाद्दरांमुळे युरियाची कुत्रिम टंचाई ; खडसेंची कारवाईची मागणी

0
114

जळगाव (प्रतिनिधी) सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत  सापडला आहे. साठेबहाद्दरांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा आरोप करत, कारवाईची मागणी माजी कृषीमंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे.

 

 

यावेळी खडसे बोलतांना म्हणाले की, मी पाच वर्ष कृषिमंत्री असताना एकदाही खताची टंचाई निर्माण झाली नाही. त्यावेळी खताचा पुरवठा व्यवस्थित होत होता. युरिया खताचे दर हे स्थिर ठेवले होते. परंतू आता शेतकऱ्यांवर युरिया खत ब्लॅकने घेण्याची वेळ आली आहे. ज्यादा दराने घ्यावे लागत आहे, पण तेही मिळत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. मी कृषिमंत्री असताना अशी वेळ शेतकऱ्यांवर कधीही येऊ दिली नाही. तसेच सरकारचे यावर नियंत्रण राहिलेले नसल्याची टीका देखील महाविकास आघाडीवर खडसे यांनी केली आहे.


Protected Content

Play sound