मुंबई (वृत्तसंस्था) भाजपातील आमदार आमच्या संपर्कात असून फुटणाऱ्या ४० आमदारांची यादी तयार असल्याचे वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बच्चू कडू पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून विरोधी पक्षच अस्थिर आहे. . पुढील ५ वर्षे महाविकास आघाडीचं सरकार स्थिर राहील. अगदी देवेंद्र फडणवीस सक्षम विरोधीपक्ष नेता असल्याचे कबुल करतील तेव्हा भाजपातील ४० आमदार फुटतील असा दावा देखील बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधान आले आहे. याबाबत भाजपकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.