यावल प्रतिनिधी । तालुक्यातील गिरडगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हा सरचिटणीसपदी फेरनिवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील यांनी ही निवड केली आहे.
प्रशांत पाटील यांना दिलेल्या निवड पत्रात म्हटले आहे की, गतकाळात पक्षसंघटना बळकटीसाठी आपण केलेल्या कार्याचा तपाशिल पाहता आपली जिल्हा सरचिटणीसपदी पुनश्च फेरनिवड करण्यात येत असून भविष्यात पक्षसंघटनंची बांधणी अधिक जोमाने करावी, असे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी प्रशांत पाटील यांच्या केलेल्या निवडीबद्दल तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, युवकाध्यक्ष अॅड.देवकांत पाटील, चोपडा विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल साठे, जिल्हा सरचिटणीस विजय पाटील, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दिनकर पाटील, राज कोळी यांनी त्यांचे अभीनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.