यवतमाळ (वृत्तसंस्था) कुलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राळेगाव तालुक्यातील कोदुर्ली (श्रीरामपूर) येथे घडली आहे. रिया गजानन भुसेवार (वय ८), मृणाली गजानन भुसेवार (वय ६) आणि संचिता गजानन भुसेवार (वय ४) अशी मृत बहिणींची नावे आहेत.
या संदर्भात अधिक असे की, गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास रिया ही कुलरमध्ये पाणी भरत होती. त्यावेळी अचानक तिला शॉक लागला. त्यामुळे मृणाली व संचिता या चिमुकल्या तिच्याकडे धावल्या. त्यांनाही जबर शॉक लागला. यात तिघींचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या चिमुकल्यांचे आई-वडील शेतात गेले होते.