जळगाव । पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार शनिपेठा परिसरातील हद्दीत कोबींग ऑपरेशन राबवितांना हद्दपार असलेले आरोपी शंकर पुंडलिक ठाकरे (वय-35, रा. कोळीपेठ, जळगाव) आणि सोन्या उर्फ प्रविण ज्ञानेश्वर सोनवणे (वय-31, रा. प्रशांत चौक, कांचन नगर, जळगाव) हे दोघी मिळून आल्याने त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्यांच्यावर 1 वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले असतांना मुदतीपुर्व दोन्ही त्यांच्या राहत्या घरी मिळून आले. दोघांवर मुपोका 142 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पथकातील यांनी केली कारवाई
शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक श्री.ससे, पोउनि श्रीधर गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक सपकाळे, पोउनि परदेशी, पो.हे.कॉ. हकीम शेख, पो.हे.कॉ. दिनेशसिंग पाटील, पो.ना.देशमुख, कॉनस्टेबल योगेश बोरसे, गजानन बडगुजर यांच्यासह दोन होमगार्ड यांनी ही कारवाई केली.