Home Cities बोदवड न. ह. रांका हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माध्यमिक शालांत परिक्षेत उज्वल यश

न. ह. रांका हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माध्यमिक शालांत परिक्षेत उज्वल यश

0
162

 

बोदवड, प्रतिनिधी । बोदवड सार्व को. ऑ. ऐज्युकेशन सोसायटी बोदवड संचलित न. ह. रांका हायस्कुलने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा एकूण निकाल ९०,५६ % लागलाअसून भावना ज्ञानेश्वर चौधरी हिने ९९.६० टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

 

न. ह. रांका हायस्कुलमध्ये दहावीत प्रथम क्रमांक भावना ज्ञानेश्वर चौधरी ९९, ६०% , द्वितिय अदिती हंसराज पाटील ९६,६०% , तृतीय क्रंमाक निर्मिती दिपक चौधरी ९५ ,२०% गुण मिळवून मनाचा तुरा रोवला आहे. ९० टक्क्यांपेक्षा पेक्षा अधिक गुण १३ विद्यार्थ्यांनी मिळवले शेकडा ७५ पेक्षा अधिक गुण ८४ विद्यार्थ्यांनी मिळवले आहे. प्रथम श्रेणित ८८ विद्यार्थी द्वतिय श्रेणीत ७५ विद्यार्थी असे एकुण २८८ विद्यार्थी उतिर्ण झाले आहे. सर्व यशस्वी गुणवंतांचे अभिनंदन सस्थेचे चेअरमन मिठ्ठुलालजी अग्रवाल , व्हाईस चेअरमन अजय जैन ,सचिव विकास कोटेजा, माजी चेअरमन व विद्यमान संचालक प्रकाशचंद सुराणा तसेच सर्व संचालक सदस्य शाळेचे मुख्याध्यापक ,उपमुख्याध्यापक ,उपप्राचार्य ,पर्यवेक्षक, शिक्षक , शिक्षकेतर ,कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound