मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या राजपूतच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी विनंती पत्राद्वारे केलेली आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी योग्य चौकशी व्हावी अशी भावना संपूर्ण देश आणि विशेषत: तरुणांची आहे. त्यामुळे याप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू करण्यात यावी, असे ट्विट पार्थ पवार यांनी केलेले आहे. प्रख्यात अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने 14 जून रोजी वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ज्यामुळे त्याच्या चाहत्यांसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला होता. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या नेमका का केली? त्याला नेमके कोणत्या गोष्टीची चिंता होती? त्याला नैराश्य आले होते का? अशा प्रशांची उत्तरे सध्या मुंबई पोलीस शोधत आहेत.