Home क्राईम रामेश्वर कॉलनीत बांधलेली गाय चोरण्याचा प्रयत्न; एकाला अटक

रामेश्वर कॉलनीत बांधलेली गाय चोरण्याचा प्रयत्न; एकाला अटक

0
115


जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी दारासमोर बांधलेली गाय चोरीच्या प्रयत्नात असलेल्या संशयित आरोपील एमआयडीसी पोलीसांनी अटक केली. संशयिताविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पंढरी कोंडू पवार (वय-५५) रा. अशोक किराणा चौक यांचे घराच्या समोर त्यांनी गाय बांधली होती. २६ जुलै रोजी रात्री ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी परवेज शेख युसुफ (वय-२०) रा. अशोक किराणा जवळ रामेश्वर कॉलनी हा अंधाराचा फायदा घेत बांधलेली गाय चोरून नेत असतांना एमआयडीसी पोलीस कर्मचारी पो.कॉ. हेमंत कळसकर, पो.कॉ योगेश बारी, पो.कॉ चंद्रकांत पाटील, विजय बावस्कर, मुकेश पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपीस अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound