शेंदूर्णी, प्रतिनिधी । येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात उद्या रविवार २६ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मौलाना आझाद पतसंस्था आणि अलफैज फौंडेशन जळगावच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबीर दुपारी २ ते ५ यावेळेत आयोजित करण्यात आले आहे. आरोग्य तपासणीसाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तोंडाला मास्क बांधून जास्तीतजास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन मौलाना आझाद पतसंस्था शेंदूर्णीचे चेअरमन शेरू काझी व व्हाईस चेअरमन निलेश थोरात, व संचालक मंडळ आणि व्यवस्थापक नज्जू काझी यांनी केले आहे.