Home Cities अमळनेर दहिवद येथील तरूणावर बलात्काराचा गुन्हा

दहिवद येथील तरूणावर बलात्काराचा गुन्हा

0
48
FIR

अमळनेर प्रतिनिधी । विवाहित तरुणीवर अत्याचार करणार्‍या दहिवद येथील तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, सुमारे चार महिन्यांपूर्वी दुपारी दहिवद येथील २० वर्षीय विवाहिता घरी एकटी असल्याचे पाहून शेजारील चंद्रकांत रमेश पाटील याने बळजबरीने घरात घुसून तरुणीवर बलात्कार केला. घटना कोणाला सांगितली तर तिचा पती बकर्‍या चारायला जंगलात गेल्यावर विहिरीत फेकून देईल, अशी धमकी दिली. यामुळे महिलेने ही घटना कोणालाच सांगितली नव्हती. यानंतर चंद्रकांत हा तिला धमकावू लागला. १९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता चंद्रकांतचा मोठा भाऊ अविनाशने महिलेच्या सासूला दारू पिऊन शिवीगाळ केली. त्यावेळी तरुणीने आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिली.

यानंतर अमळनेर पोलिस ठाण्यात चंद्रकांत रमेश पाटील याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत संशयित हा जि.प. सदस्या मीनाबाई पाटील व माजी सरपंच रमेश पाटील यांचा मुलगा असल्याने या गुन्ह्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound