चोपडा, प्रतिनिधी । कोरोना योद्धा ग्रामपंचायत कर्मचारी यांना कामाचा मोबदला व थकीत पगार न मिळाल्यास बहिष्काराचा टळकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार संघातर्फे धरणगाव येथील बैठकीत देण्यात आला आहे.
धरणगाव येथे ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे तालुका मेळाबा शारीरिक अंतर ठेवून व मास्क घालून घेण्यात आला . मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुरेश पाटील होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार महासंघ राज्य सचिव अमृत महाजन चोपडा हे उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या मेळाव्यात कामगारांनी तक्रारी मांडल्यात. यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना चार-पाच महिन्यापासून पगार नाहीत. कोविड सेंटरला ड्युटी आहे पण तेथे जाणाऱ्या येणाऱ्या कामगारांना नगरपालिका भाड ही देत नाही. शासन त्यांच्याकडून हे जास्तीचे काम करून घेते पण भत्ताही मिळत नाही. दुसरीकडे कामगारांना पगार नाहीत आणि दुसरीकडे सेंटरला ड्युटीचां वाहन खर्च करावा लागत आहे. ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगाचे रकमेतून गेल्या ३ महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता सुद्धा मिळालेला नाही. त्यांना.ग्रामपंचायत, पंचायत समिती ने तर वाऱ्यावर सोडले आहे . या तक्रारी केल्या व नंतर असे ठरले की येत्या मंगळवारी २१ जुलै रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना पाळधी मुक्कामी सकाळी नऊ वाजता निवेदन द्यावे. तसेच कोविड ड्युटीबद्दल तीनशे रुपये पर डे भत्ता द्यावा. जाण्या-येण्याचे भाडे द्यावे आणि थकित पगार विनाविलंब द्यावा अन्यथा कर्मचारी जळगाव जिल्ह्यात इतर कामावर संपूर्ण टाकतील असा इशारा देण्यात आला. बैठकीला रतिलाल पाटील, पंडीत भिल अरुण पाटील, डिगा भोई, ज्ञानेश्वर सातपुते ,जिजाबराव पाटील, नंदू पाटील, विनोद शिरसाठ, रवींद्र पाटील, दिलीप पाटील, संतोष पाटील, राजेंद्र ठाकूर हे कर्मचारी उपस्थित होते.