जळगाव, प्रतिनिधी । येथील भाऊसाहेव राऊत ( जुनी सागर हायस्कुल )चे माजी मुख्याध्यापक पांडुरंग बुधो सपकाळे ( वय ८१) यांचे आज दिनांक १८ रोजी वृद्धपकाळाने निधन झाले.
पांडुरंग सपकाळे यांची अंत्ययात्रा आज ४ वाजता २५ मोहन नगर येथील राहत्या घरून निघून मेहरूण वैकुंठ भूमीत जाणार आहे. पांडुरंग सपकाळे हे कवयित्री बहिणाबाई चौधरी येथे कार्यरत असलेले संजय सपकाळे व स्टेट बँकेत कार्यरत विजय सपकाळे तसेच राजेश सपकाळे यांचे वडील होत.पांडुरंग सपकाळे यांच्या मागे पत्नी ,तीन मुल ,मुलगी ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.