Home धर्म-समाज शिरसाड येथे दिंडीचे भव्य स्वागत

शिरसाड येथे दिंडीचे भव्य स्वागत


WhatsApp Image 2019 03 03 at 1.38.01 PM

यावल (प्रतिनिधी)। मुक्ताईनगर येथे महाशिवरात्री साठी जात तालुक्यातील किनगाव येथून निघालेल्या दिंडीचे हरीनामाच्या गजरात बुधवारी दुपारी तालुक्यातील शिरसाड येथे आगमन झाले. विकासोचे माजी चेअरमन राजेंद्र एकनाथ पाटील व यावल तालुका सहकारी शेतकरी खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक धनंजय एकनाथ पाटील यांनी दिंडीचे स्वागत केले.

दिंडीचा व्यास मंदीरात मुक्काम
याप्रसंगी ग्रामस्थांनी दिंडीचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. दिंडीस्वागतासाठी पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, डांभुर्णी सरपंच पुरुजित चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी पाटील, किनगावचे विजयकुमार देवचंद पाटील, पं.स. उपसभापती उमाकांत पाटील, यावलचे पी.के. परदेशी उपस्थित होते. दुपारचे भोजन व विश्रांतीसाठी पाटील परिवाराकडे गेल्या १६ वर्षापासून येत असल्याची परंपरा आहे. ती परंपरा या वर्षीही कायम ठेवण्यात आली. सायंकाळी शिरसाड, वढोदा मार्गे दिंडीचे यावल येथील व्यास मंदिरात आगमन झाले. अल्प विश्रांतीनंतर रात्रीचे मुक्कामासाठी तालुक्यातील टेंभी येथे मुक्कामासाठी रवाना झाली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound