जळगाव । जी.एस. ग्राऊंडच्या कोपऱ्यावर सकाळी 11.30 ते 12 वाजेच्या सुमारास आठ ते दहा तरूण पत्ते खेळत असल्याची माहिती जिल्हा पेठ पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत मुद्देमालासह चौघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत महिती अशी की, जी.एस. ग्राऊंडच्या मैदानावर एका आडोशाला आठ ते दहा जणांचा जमाव सट्टे व पत्ते खेळत असल्याची माहिती जिल्हा पेठ पोलीसांना मिळाली.
जिल्हापेठचे पोलीस कर्मचारी राजू मेंढे, छगन तायडे, शेखर जोशी, शिवाजी धुमाळे आणि हेमंत तायडे या पथकाने जी.एस.ग्राऊंडवर कारवाई करत संशयीत बाबुलाल परदेशी रा. भारत नगर, मनोज शिकारे, विजय भावसार दोन्ही रा. जूने जळगाव आणि पंढरीनाथ सोनवणे रा. शिररोली रोड, जळगाव या चौघांना रविवारी सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले तर इतर चौघेजण पळ काढून फरार झाले. चौघांकडून 1210 रूपयांचा मुद्देमाल जप्त केली.
शनिवारीही केली होती चौघांवर कारवाई
जिल्हा पेठ पोलीसाच्या याच पथकाने शनिवार 2 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास पत्ते खेळणारे चौघांना ताब्यात घेतले होते. या कारवाईत 2470 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.