राज्य पोलीस दलात १२ हजार पदांची जम्बो भरती ; गृहमंत्री देशमुखांचे आदेश


मुंबई (वृत्तसंस्था)
राज्यात पोलीस दलात तब्बल १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत हे पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. अगदी डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची ‘डेडलाईन’ही गृहमंत्र्यांनी दिल्यामुळे राज्यात येत्या काही दिवसात पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

 

 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्रलयात एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्याचे आदेश देशमुख यांनी दिले आहेत. अगदी डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची ‘डेडलाईन’ही त्यांनी दिले आहेत. या बैठकीत कोणती कोणती पदे आणि कोणत्या कोणत्या विभागात रिक्त आहेत. तसेच ही भरती प्रक्रिया सुरू केल्यानंतर कधी पर्यंत पूर्ण होईल, याचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत. स्वत: देशमुख यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. या बैठकीला गृहविभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, अर्थ विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Protected Content