Home Cities जळगाव रोटरी क्लब ऑफ स्टार्स यांच्या वतीने  गहू व तांदूळ दान

रोटरी क्लब ऑफ स्टार्स यांच्या वतीने  गहू व तांदूळ दान

0
29


जळगाव, प्रतिनिधी । केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित, शहरी बेघर निवारा गृह येथील वृध्द लाभार्थ्यांकारिता रोटरी क्लब ऑफ स्टार्स यांच्या वतीने १५० किलो गहू व १२० किलो तांदूळ आज एका छोटेखानी कार्यक्रमात देण्यात आले.

शहरी बेघर निवारा गृहचे प्रकल्प प्रमुख दिलीप चोपडा, रोटरी क्लब ऑफ ३०३० चे असिस्टंट डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. तुषार फिरके, क्लब अध्यक्ष धनराज कासट यांचेसह सागर मुंदडा, चेतन सोनी, नीरज अग्रवाल, जिनल जैन, सचिन बलदवा, कादर मेमन उपस्थित होते. अध्यक्ष धनराज कासट यांनी आगामी वर्षात रोटरी क्लब ऑफ स्टार्स शहरी बेघर निवारा गृहास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दिलीप चोपडा यांनी रोटरी क्लब ऑफ स्टार्सच्या सर्व सदस्यांचे आभार मानत केशवस्मृती प्रतिष्ठान चे कार्य सामाजिक काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थाच्या सहकार्याने सुरु असून त्यात रोटरी क्लब ऑफ स्टार्स ची भर पडली असल्याचे सांगितले.


Protected Content

Play sound