सारथी बंद होणार नाही, उद्याच आठ कोटींचा निधी दिला जाईल : उपमुख्यमंत्री अजित पवार


मुंबई (वृत्तसंस्था)
सारथी बंद होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अधिकारात घेतली जाणार. तसेच उद्याच सारथीला आठ कोटींचा निधी दिला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

 

 

या बैठकीनंतर अजित पवारांनी या सारथी संस्थेसाठी ८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. तसेच सारथी संस्था बंद होणार नाही. कुणीही अफवा पसरवू नका. मराठा समाजात गैरसमज पसरवू नका, सारथीचे काम पारदर्शी व्हावे, असे अजित पवार म्हणाले. सारथीवर उत्तर शोधायचं की फाटे फोडायचे? मला सारथीवर मार्ग काढायचा आहे, यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावणार, दर दोन महिन्यांनी याचा पाठपुरावा घेणार, असं अजित पवार म्हणाले. मराठा-ओबीसी असा वाद भासवण्याचा प्रयत्न केला, मात्र असा कोणताही विषय नाही, संभाजीराजेंच्या ट्विटनंतर मी स्वतः विजय वडेट्टीवारांशी बोललो, असेही अजित पवारांनी सांगितले. राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी सुरु केलेल्या सारथी संस्थेच्या बैठकीत बसण्यावरुन सुरुवातीला वाद झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या दालनात बोलावून बैठक घेतली. यावेळी अजित पवार यांनी संभाजीराजे यांना आपल्यासोबत समोर मंचावर बसवले. या बैठकीत मंत्री विजय वडेट्टीवार, नवाब मलिक, सचिन सावंत हे देखील उपस्थित होते.

Protected Content