जळगाव, प्रतिनिधी । येथील कोरोना पेशंटची वाढती संख्या व त्यादृष्टीने उपायोजना करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन जळगाव येथील सामाजिक संघटनेच्या सहकार्याने थर्मल स्क्रिनिंग संपूर्ण कुटुंबातील नागरिकांची करत आहेत. या अभियानात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव शाखेच्या कार्यकर्त्यांनी आज बुधवार ८ जुलै रोजी सहभाग घेतला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या कार्यकर्त्यांनी थर्मल स्क्रिनिंग अभियानात सहभाग घेऊन टागोर नगर व पोलीस कॉलनी परिसरातील १८९ कुटुंबाची थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली. “हम युवा है हम करे मुश्किलों से सामना, मुश्किलों से सामना” या पंगती प्रमाणे सातत्याने विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते विविध माध्यमातून कोरोना काळात विद्यार्थी व नागरिकांना सहकार्य करत आहे. या थर्मल स्क्रिनिंग अभियानात रितेश चौधरी, हर्षल तांबट, आदेश पाटील, पवन भोई, मानस शर्मा, पवन भोळे, विलास पाटील, श्रीकांत पवार, आकाश धनगर, शुभम सोनार, सागर बाविस्कर, सिद्धेश्वर लटपटे या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.