Home Cities जळगाव भाजपा जिल्हा महानगर बारा-बलुतेदार आघाडी अध्यक्षपदी दिपक बाविस्कर

भाजपा जिल्हा महानगर बारा-बलुतेदार आघाडी अध्यक्षपदी दिपक बाविस्कर

0
33

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीच्या जळगाव जिल्हा महानगरच्या संघटनात्मक निवड प्रक्रिया सुरु असून जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी आतापर्यंत अनेक आघड्याचे अध्यक्ष निवड प्रक्रिया पूर्ण केली आहे. यानुसार बारा बलुतेदार भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या आघाडी अध्यक्षपदी दिपक पुंडलिक बाविस्कर यांची निवड नुकतीच जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी जाहीर केली.

दिपक बाविस्कर यांनी अनेक सामजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज महासंघ, महाराष्ट्र प्रदेश युवक कार्याध्यक्ष,श्री संत गाडगेबाबा बहुउद्देशिय संस्था प्रसिद्धी प्रमुख, अध्यक्ष सद्गुरु साईनाथ संस्था, जळगाव चौफ़ेर संपादक, गाडगेबाबा जयंती समिती मेहरुण प्रमुख तसेच कॉंग्रेस ओबीसी शहर जिल्हा अध्यक्ष काम पहिले आहे. कुशल संघटक सामाजिक अनुभव व सर्व समाजाशी जनसंपर्क असल्याने दिपक बविस्कर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री गिरीश महाजन, एकनाथराव खडसे, विभागीय संघटन मंत्री अॅड.किशोर काळकर आ.चंदूभाई पटेल, माजी आ.गुरुमुख जगवाणी ,महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर भारतीताई सोनवणे, माजी महापौर सिमाताई भोळे, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, वि.क्षे.प्रमुख दीपक साखरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, नगरसेविका सुरेखाताई सोनवणे, उपगट नेते राजेंद्र घुगे पाटिल, माजी महापौर सदाशिव ढेकळे, सुनिल पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound