जळगाव प्रतिनिधी । जळगावात आज पुन्हा ५६ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. तर अन्य तालुक्यांमध्येही पेशंटची संख्या वाढल्यामुळे आज जिल्ह्यात १५६ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण १५६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ५६ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल जळगाव ग्रामीणी १८, जामनेर १३, रावेर व भुसावळ प्रत्येकी १२ अशी रूग्णसंख्या आढळून आली आहे. जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधित रूग्ण ४ हजार ५८६ रूग्ण झाले आहे. त्यापैकी २ हजार ७१७ रूग्ण बरे होवून घरी पाठविले आहे. एकुण २८२ जणांचा मृत्यू झाला असून १ हजार ५ ८७ रूग्ण उपचार घेत आहे.
आजचा अहवाल
अन्य ठिकाणांचा विचार केला असता, अमळनेर ७, चोपडा ८, पाचोरा ४, भडगाव ३, धरणगाव ७, यावल ३, एरंडोल १, मुक्ताईनगर १०, बोदवड १, इतर जिल्ह्यातील १ अशी रूग्णसंख्या आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांचा एकुण आकडा
जळगाव शहर १०१४, जळगाव ग्रामीण – १८७, भुसावळ- ४८२, अमळनेर-३९०, चोपडा-३१०, पाचोरा-१०७, भडगाव २५३, धरणगाव-१९९, यावल-२७५, एरंडोल- २३५, जामनेर -२४२, रावेर-३३५, पारोळा- २५७, चाळीसगाव-७५, मुक्ताईनगर-८१, बोदवड १३०, दुसऱ्या जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात आलेले १४ अशी संख्या आहे.