जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आत तब्बल २०९ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यात जळगाव शहरात ५५ बाधीत आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या चार हजारांच्या पार गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण २०९ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ५५ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल एरंडोल येथे २८; पारोळा-२२ आणि भुसावळातील १८ रूग्णांचा समावेश आहे.
अन्य ठिकाणांचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण-१३; भडगाव १३; चोपडा-११; रावेर-१०; मुक्ताईनगर-१; धरणगाव-६; अमळनेर-८; जामनेर-७; चाळीसगाव-४; यावल-११ असे रूग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, आजच्या बाधितांची संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ४००७ इतका झालेला आहे. यातील २३३५ रूग्ण बरे झाले असून सध्या १४२० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आजवरील मृतांची संख्या २५२ इतकी असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.