शिवणकाम कारागीरांनी योजनांचा लाभ घ्यावा- बी.टी.पाटील

WhatsApp Image 2019 03 01 at 11.40.16 AM

चाळीसगाव (प्रतिनिधी)। ‘महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून शिवणकाम करणाऱ्या कारागीरांसाठी विविध कल्याणकारी योजना असून त्यांचा कारागीरांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घ्यावा’, असे आवाहन येथील महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राचे संचालक बी.टी. पाटील यांनी केले. येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेतर्फे समाजाच्या फुले कॉलनीतील संत नामदेव महाराज समाज मंदिरात आज जागतिक टेलर दिनानिमित्त आयोजित शिवणकाम करणाऱ्या व्यावसायिक व कारागीर बांधवांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
पाटील यांनी सांगितले, की कामगार पाल्यांसाठी सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी उच्चशिक्षण शिष्यवृत्ती, क्रीडा शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तकांसाठी अर्थसाह्य, एम. एस. सी. आय. टी. कोर्ससाठी अर्थसाह्य यासारख्या योजनांचा लाभ दिला जातो. मंडळाच्या तसेच सरकारमान्य शिवणवर्गाच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण कामगार किंवा त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेतंर्गत शिवण मशीन खरेदीसाठी अनुदान दिले जाते असे सांगून कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली.

महिलांचा सत्कार
प्रास्ताविकात दिलीप कापडणे यांनी शिंपी समाजातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन टेलर दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या नीलेश मांडगे व पंकज कापुरे यांच्यासह उपस्थित शिवणकाम व्यावसायिक कारागीरांसह महिलांचा सत्कार करण्यात आला. समाजाचे अध्यक्ष दिलीप कापडणे यांच्यातर्फे सत्कारार्थींना शिवणकामासाठी उपयोगी पडणाऱ्या साहित्यांचे कीट भेट देण्यात आले. आनन शिंपी यांनी सूत्रसंचालन तर संस्थेचे सचिव प्रमोद शिंपी यांनी आभार मानले.

यशस्वितेसाठी यांनी घेतल परिश्रम
समाजाचे अध्यक्ष दिलीप कापडणे अध्यक्षस्थानी होते. मध्यवर्ती कार्यकारिणी सदस्य विजय खैरनार, प्रमोद जगताप, तालुकाध्यक्ष संजय निकुंभ, संत नामदेव महाराज पतसंस्थेचे चेअरमन घनःश्‍याम शिंपी, डॉ. सचिन निकुंभ व्यासपीठावर उपस्थित होते. यशस्वितेसाठी युवक अध्यक्ष गणेश निकुंभ, कार्यकारिणी सदस्य अनिल कापडणे, रुपेश पवार, राजेंद्र मांडगे, सुदर्शन कापडणे आदींचे सहकार्य लाभले. याप्रसंगी जिल्हा महिला कार्याध्यक्षा मोहिनी कापडणे, तालुकाध्यक्षा योगिता शिंपी, महिला सचिव किर्ती खैरनार, तालुका सचिव डॉ. नीता निकुंभ, डॉ. रुपाली निकुंभ, रुपाली खैरनार, भाग्यश्री निकुंभ यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

Add Comment

Protected Content