Home क्राईम काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा


indian army kashmir 1473490123

श्रीनगर (वृत्तसेवा) पाकिस्तानी रेंजर्संने सीमारेषेवर आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यास, भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. तर दुसरीकडे कुपवाडा येथे भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत एक भारतीय जवान जखमी झाला असून त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

शुक्रवारी सकाळीच कुपवाडा जिल्ह्यातील सीमाभागात दहशतवादी घुसल्याची गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर, सुरक्षा जवानांनी शोधमोहिम राबवून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पुलवामा हल्ल्यानंतर सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. पाकिस्तानकडून गुरुवारी (28 फेब्रुवारी) रोजीही सकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी सेक्टरमध्ये हा गोळीबार करण्यात आला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound