Home आरोग्य जिल्ह्यात १०६ नवीन कोरोना पॉझिटीव्ह; जळगाव शहरात सर्वाधीक रूग्ण !

जिल्ह्यात १०६ नवीन कोरोना पॉझिटीव्ह; जळगाव शहरात सर्वाधीक रूग्ण !

0
34

जळगाव प्रतिनिधी । आज जिल्ह्यात १०६ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यात जळगाव शहरातील सर्वाधीक ३७ रूग्णांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज रात्री एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोनोच्या रिपोर्टबाबतची माहिती अपडेट केली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण १०६ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ३७ रूग्ण जळगाव शहरातील असून याच्या खालोखाल पारोळा-१७ व एरंडोल तालुक्यात १५ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. याच्या सोबत भुसावळ, अमळनेर व चोपडा-प्रत्येकी ४, जळगाव ग्रामीण, जामनेर व धरणगाव प्रत्येकी-३, यावल-८, पाचोरा-१, रावेर-५ आणि जिल्ह्याबाहेरील-२ अशा रूग्णांचा समावेश आहे.


Protected Content

Play sound