नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आज सलग सतराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. पेट्रोलचे दर २० पैशांनी तर डिझेलमध्ये ५५ पैशांनी वाढ झाली आहे.
कोरोना संकटातच नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे महागाईचे चटके बसत आहे. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर ७९.७६ रुपयांवर पोहोचले असून डिझेलचा प्रति लिटर दर ७९.४० पैसे आहे. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आता फक्त ३६ पैशांचाच फरक आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील अंतर एवढं कमी होण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. मुंबईत आज पेट्रोलचा दर ८६.५४ रुपये असून डिझेल ७७.७६ रुपये आहेत. मुंबईतही पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील अंतर अवघे नऊ रुपये आहे.