फैजपूर, प्रतिनिधी। येथील कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत एकूण १०२ कोरोना रुग्ण रोगमुक्त झाले आहेत..या कोविड केअर सेंटरमधील कोरोना योद्धयांच्या कामांचे कौतुक करत खोटया बाबींवर विश्वास ठेवू नये असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले आहे.
डॉ. अजित थोरबोले यांनी म्हटले आहे की, फ़ैजपूर कोविड केअर सेंटर येथून १०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले सर्व शक्य झाले आहे ते तेथील डॉक्टर,नर्स,फार्मसिस्ट, सफाई कर्मचारी,शिपाई, ऍम्ब्युलन्स ड्रायव्हर यांनी घेतलेली रुग्णाची अविरत काळजी. यामुळेच तसेच या ठिकाणी ज्या रूग्णांना आवश्यक आहे त्यांना रेफर केल्यामुळे ५० पेक्षा जास्त रुग्णांचे प्राण हे केवळ येथील डॉक्टर यांनी समायसुचिकता दाखवल्यामुळे वाचले आहेत. .या सेन्टर मध्ये आयसीएमआर मार्गदर्शक सूचना प्रमाणे औषध उपचार केला जातो..खोट्या बाबीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन उपविभागीय आधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी केले आहे.