चोपडा, प्रतिनिधी । शहरात सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातर्फे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांच्या आरोग्य जनजागृतीसाठी २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.
कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२१ जून रोजी शिरपूर येथील योग विद्याधामचे डॉ. श्रीकांत वाडीले यांच्या योग प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव काळातही ऑनलाईन माध्यमातून डॉ.श्रीकांत वाडीले यांनी योगाचे अनेक प्रकार, प्राणायाम यांवर प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच त्यांचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्व पटवून सांगितले. योगा हा योगदिवस पुरता मर्यादित न ठेवता रोजच उत्तम आरोग्यासाठी योगा करणे आजच्या काळात महत्वाचे आहे हे पटवून दिले.