जळगाव प्रतिनिधी । शहरातील काबरा पेट्रोल पंपाजवळ मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील ४८ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील काबरा पेट्रोल पंपाशेजारी गणपती सीटी स्कॅन शेजारी गणेश दुलाराम महाजन रा. महाबळ हा कल्याण मटका नावाचा सट्टाजुगाराचे आकड्यावर नागरीकांकडून पैस घेवून जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती सहायक पोलीस अधिक्षक निलाभ रोहन यांना मिळाली. त्यानुसार आज १८ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकली. धाडीत संशयित आरोपी गणेश दुलाराम महाजन रा. महाबळे, नरेंद्र तुळशीराम पवार (वय-३२) रा. जयनगर, गजानन संतोष महाजन (वय-३८) रा. हरीविठ्ठल नगर स्टॉप साईमंदीराजवळ यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील रोख रकमेसह दुचाकी, दोन मोबाईल, जुगाराचे साहित्य असा एकुण ४८ हजार ७० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे स.फौ. सुनिल पाटील, पोहेकॉ अनिल पाटील, पोहकॉ विजय काळे आणि पोकॉ रविंद्र मोतीराया यांनी कारवाई केली.