जळगाव प्रतिनिधी । कोवीड रूग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस आलेल्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांची दूरध्वनीद्वारे मागणी केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांची बदली आणि संबंधित अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले असल्याचे मराठे यांनी कळविले आहे.
एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जिल्ह्यातील भोंगळ कारभार व जिल्हा प्रशासनाचा हलगर्जीपणा व जिल्ह्यातील प्रशासनाचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांचा गेल्या दोन महिन्यांमधील अपयशी कार्यकाळ बघता जिल्हाधिकारी यांची तातडीने बदली करावी व त्यांच्या जागी सक्षम अधिकारी यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली.
कोट-
उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी या संपूर्ण प्रकाराला जबाबदार असलेले जिल्हाधिकारी व इतरही अधिकारी यांची तातडीने बदली करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लवकरच जिल्हाधिकारी यांची बदली होऊन नवीन जिल्हाधिकारी जळगाव जिल्ह्याला मिळणार आहे. जेणेकरून जिल्ह्यामध्ये कोरोणा आटोक्यात आणण्यासाठी नवीन जिल्हाधिकारी यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे अपेक्षा लागून राहिलेली आहे.
-देवेंद्र मराठे