Home Cities अमळनेर पाडळसरे जनआंदोलनाला महाराष्ट्र पत्रकार संघाचा पाठिंबा

पाडळसरे जनआंदोलनाला महाराष्ट्र पत्रकार संघाचा पाठिंबा


f9db7757 5962 4ad2 9a56 391bab2ed9f1

अमळनेर (प्रतिनिधी) खानदेशातील शेतकऱ्यांना संजीवनी देणारे पाडळसरे धरणासाठी निधी मिळावा यासाठी गेल्या आठवड्यापासून साखळी उपोषण पंचायत समिती समोर सुरू आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र पत्रकार संघ अमळनेर तालुक्यातील पत्रकार बांधवानी नुकताच जाहिर पाठिंबा दिला आहे.

 

पाडळसरे धरणाला भरीव निधी मिळावा यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी व सर्वच क्षेत्रातील लोकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या हितासाठी महाराष्ट्र पत्रकार संघ व अमळनेर तालुक्यातील पत्रकार बांधवानी पाठिंब्याचे पत्र नुकतेच जनआंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी, माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील व पदाधिकारी यांना दिले. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय सूर्यवंशी, सल्लागार गं का. सोनवणे, विजय सुतार व पत्रकार बांधव उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound