धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव कोवीड केअर सेंटरला नुकताच संशयित कोरोना रूग्णांचा अहवाल प्राप्त झाला असून चार जणांचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यातील दोन डॉक्टरांसह कुटुंबातील एक आणि मयत झालेल्या व्यक्तीचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.
गुरूवारपर्यंत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या २० वर पोहचली होती. आज नव्याने चार रूग्णांची भर पडली असून एकुण रूग्ण संख्या २४ वर पोहचली आहे. आज आढळून आलेल्या अहवालात शहरातील अग्नीहोत्री गल्लीतील दोन डॉक्टर व त्यांच्या संपर्कातील एकजण तर चौथ्या रूग्णाचा दोन दिवसांपुर्वी मृत्यू झाला होता. त्यांचा तपासणी अहवाल आज पॉझिटीव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मयत रूग्ण हो मोठा माळीवाड्यातील रहिवाशी असल्याने मोठा माळीवाडा आणि अग्नीहोत्री गल्ली परिसर धरणगाव प्रशासनातर्फे सील करण्याचे काम सुरू आहे. नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.