Home आरोग्य रावेर तालुक्यात पुन्हा १७ कोरोना पॉझिटीव्ह

रावेर तालुक्यात पुन्हा १७ कोरोना पॉझिटीव्ह

0
27

रावेर प्रतिनिधी । आज रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये रावेर तालुक्यात १७ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून याला तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दुजोरा दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यात पुन्हा १७ कोरोना पोझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून अनेकांच्या काळजीत भर पडली आहे. तालुक्यात रावेर शहरात चार कोरोना पोझिटीव्ह आला असून सावदा अकरा येथे दोन कोरोना पोझिटीव्ह आले आहे तर खानापुर व गाते प्रत्येकी येथे एक जण कोरोना पोझीटीव्ह आले आहेत. तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून संबंधीत रूग्णांच्या वास्तव्यांचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound