खरेदी केंद्रातील कापूस अवकाळी पावसाने भिजला

 

रावेर, प्रतिनिधी | लॉकडाऊन नंतर रावेर यावल तालुक्यातील ३७५ कापुस उत्पादक शेतक-यांनी कृषी उपन्न बाजार समितीला नोंदणी केली. त्यापैकी ७० शेतकऱ्यांची ९३० क्विंटल ६५ किलो कापुस खरेदी केले. दुदैवी म्हणजे खरेदी केलाला कापुस काल आलेल्या अवकाळी पासवाने ओला झाला आहे.

कापसाला सीसीआर टेपल पाहुन ५२०० ते ५४०० भाव आहे. लॉकडाउननंतर रावेर तालुक्यातील कपाशी उत्पादक २४६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यावल तालुक्यातील १२९ शेतकऱ्यांनी नोंदणी केले आहे. त्यापैकी ७० शेतक-यांची ९३० क्विंटल ६५ किलो कापुस खरेदी केला आहे. त्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे खरेदी केलेला कापुस थोडासा ओला झाला आहे.

Protected Content