पारोळा (प्रतिनिधी)। गायत्री जयंतीच्या निमित्ताने १ जून रोजी शांतीकुंज हरीद्वार गायत्री परिवार यांच्या वतीने कोरोना महामारी विश्वशांसाठी गायत्री महायज्ञ केला आहे.
आज जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असुन गेल्या तीन महिन्यापासून संपुर्ण देशांत रूग्ण संख्या वाढतच आहे व महाराष्ट्रात देखील दिवसा गणित गुणाकाराने वाढ होत असतांना संपुर्ण जनजीवन विसकळीत झालेले असताना शासन व प्रशासनाने खबरदारी म्हणून जनता कर्फ्यू लॉकडाऊने जनतेत जनजागृती केलेली आहे, परंतु आज जीवनावश्यक वस्तू बरोबरच कृषी प्रधान देश असल्याने शेतकरी बांधवानसाठी शेती मशागत करणे ही अवश्यक असतांना मात्र कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. जनतेने अजुनही बाहेरगावी जाणे-येणे टाळणे देखील आवश्यक आहे. कारण आज इकडुन तिकडुन येत असलेल्या व बाहेर गांवील लोकांच्या संपर्काने रूग्ण संख्या वाढत असुन जनतेने खबरदारी घेऊन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आजाराने घाबरू नये तर काळजीने गरम पाणी , काढा, व्यायम, गरम मासालायुक्त प्रदार्थानचे नियमित सेवना बरोबर तोंडाला माॅक्स लावणे, हात धुणे , बाहेरून आल्यावर कपडे धुण्यास टाकणे १० वर्षा आतील लहान मुले, ६० वर्षावरील वृध्द यानी घराबाहेर फिरू नये व कामाशिवाय जास्त वेळ बाहेर निघु नये या खबरदारी बरोबरच आपण सर्वानी नियमित गायत्री मंत्राचे पठण व लिखाण करावे. गायत्री परिवारचे सुभाष धमके सर, माधवराव शिंपी, योगेश मैंद सर, प्रशांत येवले, गणेश शिंपी यांनी गृहे गृहे गायत्री यज्ञ मोबाईल पंडित या लिंकद्वारे शहरात जनजागृती करून संपन्न केले.