जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रिम कॉलनीत बेकायदेशीर देशी व गावठी दारू विक्री करणाऱ्या संशयिताला अटक करून त्याच्या ताब्यातून तीन हजारांची दारू जप्त करण्यात आली आहे.
शहरातील सुप्रिम कॉलनीत ब्लॅकने दारू विक्री होत असल्याची माहिती निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळाली होती. माहितीची खात्री करण्यासाठी पोलिस नाईक विजय नेरकर, जितेंद्र राजपूत, नीलेश पाटील, अशांनी सुप्रिम कॉलनी गाठल्यावर आजाद बहादूर कंजर (वय-35) हा रामदेव बाबा मंदिरा जवळ ब्लॅकने दारू विक्री करताना आढळून आला असून त्याच्या ताब्यातून 24 देशी दारूच्या बाटल्यांसह 35 लिटर गावठी हातभट्टीची दारू असा एकूण 3 हजार 48 रुपयांचा ऐवज जप्त करून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.