मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा ४० हजारच्या उंबरठ्यावर

मुंबई वृत्तसंस्था । मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ४० हजारच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. रविवारी दिवसभरात १२४४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ३९ हजार ६८६ वर पोहोचली आहे. तर मुंबईत ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १ हजार २७९ वर पोहोचला आहे.

मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मुंबईतील धारावी परिसरात कोरोनाचे रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबईतील जवळपास ६ वॉर्डात जवळपास २ हजारपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. यात धारावी, माहिम, माटुंगा, दादर या परिसरांसह इतर परिसरांचा समावेश आहे.

Protected Content