‘कंटेनमेंट झोन’मध्ये पोलिसांची गैरहजेरी; क्वारंटाईन फिरताय मुक्तपणे

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी भागात कोरोनाचा रूग्ण आढळून आल्याने परिसरातील सेवा मंडल, टी.एम.नगर आणि सब्जी मंडी येथील परिसर २६ दिवसांपासून कंटेनमेंट झोन घोषीत केला असला तरी काही नागरिकांनी तेथील कठडे काढून टाकल्याने, तसेच बंदोबस्ताला पोलीस नसल्याने नागरिकांची मोठी वर्दळ सुरू आहे. होम क्वारंटाईन करण्यात आलेले काही लोक बेफामपणे शहरातील फिरत आहेत. याबाबत सुज्ञ तरूणांनी महापालिकेच महापौर व आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यावरही याकडे डोळेझाक केले असल्याची तक्रार लाईव्ह ट्रेन्डस न्यूजच्या कार्यालयात प्रत्यक्ष येवून केली आहे.

याबाबत माहिती अशी की, सिंधी कॉलनीतील टी.एम.नगर, सेवा मंडल आणि भाजीबाजार परिसरात गेल्या महिन्याचे कोरोनाचे दोन रूग्ण आढळून आले होते. त्यामुळे तो परिसर सील करण्यात आला होता. काही लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. याबाबत सुज्ञ नागरीकांनी वार्डाचे नगरसेवक भगत बालाणी यांच्या कानावर ही बाब घातली. तरी देखील काहीही एक उपयोग न झाल्याने काही तरूणांनी महापौर भारती सोनवणे यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि परिस्थीती कथन केली. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस प्रशासनाला कळवून देखील कंटेनमेंट झोन येथे होमगार्ड किंवा पोलीस तैनात नाही. याचा फायदा रहिवाश्यांनी घेत वर्दळ सुरू केली आहे. त्यामुळे येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नागरिकांनी केली आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात पोलीसांचा बंदोबस्त लावावा अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

Protected Content