एरंडोल येथे रोग प्रतिकारकता वाढविणार्‍या औषधींचे वाटप

एरंडोल प्रतिनिधी । येथील वार्ड क्र.२ मधील नगरसेविका दर्शना विजय ठाकुर व आरोग्यम धनसंपदा फाउंडेशनचे जितेंद्र पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गरीब व गरजु लोकांना आर्सेनिक अल्बम – ३० या औषधीच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

सध्या कोरोना विरुद्ध रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून आर्सेनिक अल्बम ३० हे होमिओपॅथी औषध उपकारक ठरले आहे. या अनुषंगाने प्रभाग क्रमांक २ मधील केवडीपुरा, भीमनगर,सुमारे १२०० नागरिकांना गोळ्या वाटप करण्यात आल्या. यावेळी नगरसेविका दर्शना ठाकूर, विजय ठाकुर, सरोजबाई पाटील, अजय राजपूत, बापू महाजन, प्रविण ठाकूर व नागरिक उपस्थित होते.

Protected Content