वडली येथील शेतात मनोविकृतांनी ठिबक नळ्या व पाईप जाळले; पोलिसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्‍यातील वडली येथील एका शेतकऱ्याच्या शेतात जैन ठिबक सिंचन बसविण्यात आले होते. काही मनोविकृतांनी शेतातील ठिबकच्या नळ्या व पाईप जाळून टाकल्याची घटना बुधवारी २७ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तालुका पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्‍यातील वडली येथील सोपान वामन पाटील हे आई, वडील, पत्नी व आपल्या मुलाबाळांसह वास्तव्यास आहे. त्यांचे सुभाषवाडी येथील शिवारात शेत देखील आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी सोपान पाटील यांनी आपल्या शेतात जैन ठिबक सिंचन केले होते. दोन महिन्यांपासून शेतातील ठिबकाच्या नळ्या व पाईप त्यांनी शेतात वेगवेगळ्या ठिकाणी जमा करुन ठेवले होते. गुरुवारी २८ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सोपान पाटील हे शेतात कामासाठी गेले असता. तयांना शेतात तीन ठिकाणी ठेवलेल्या ठिबक सिंचनाच्या नळ्या व पाईप जळालेल्या अवस्थेत दिसले. याप्रकरणी अज्ञात मनोविकृतांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. शिवदास चौधरी करीत आहे.

शेतातील साहित्य जाळले
शेतात ठेवलेल ठिबक सिंचनाच्या नळ्या व पाईपांना अचानक आग लागू शकत नाही. या साहित्याला कोणीतरी अज्ञात इसमाने द्वेश बुद्धीने जाळून टाकल्याचे समोर आले आहे. शेतातील साहित्य जाळल्यामूळे सोपान पाटील यांचे सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Protected Content