Home Cities अमळनेर “२१ व्या शतकातील यशस्वी उद्योग” चर्चासत्राला उस्फुर्त प्रतिसाद

“२१ व्या शतकातील यशस्वी उद्योग” चर्चासत्राला उस्फुर्त प्रतिसाद


3bc3b8dd dd50 482a 96c1 93ab069365b9

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पंडित जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालयात “२१ व्या शतकातील यशस्वी उद्योग” यावर चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रमसाफल्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित भांडारकर होते.

 

यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, प्रा. जगदीश सोनवणे, प्रा. मयुर बागुल व उदयकाळ फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळकृष्ण बागुल हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे वक्ते तेजस सुनिल पवार यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. २१ व्या शतकातील यशस्वी उद्योग यावर चर्चा करतांना तंत्रज्ञानाचा वापर करून आपण युवकांनी व्यवसाय कश्या पध्दतीने उभे करु शकतो हे समजून सांगितले. देशातील सर्वात मोठी ताकद ही युवकांची आहे त्यात नोकरी फार कमी प्रमाणात उपलब्ध होतात त्यामुळे युवकांनी उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. सदरील चर्चासत्रात महाविद्यालयातील ६२ विद्यार्थी उपस्थित होते. चर्चासत्र आयोजित करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालय विद्यार्थीनी मानले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound