Home राष्ट्रीय शोपियामध्ये दहशतवाद्यांना जवानांनी घेरले; चकमक सुरू

शोपियामध्ये दहशतवाद्यांना जवानांनी घेरले; चकमक सुरू

0
60

श्रीनगर वृत्तसंस्था । जम्मू-काश्मिरमधील शोपिया परिसरातील एका घरात जवानांनी दहशतवाद्यांना घेरले असून जोरदार धुमश्‍चक्री सुरू असल्याचे वृत्त आहे.

काश्मिर खोर्‍यातील शोपिया परिसरातील एका घरामध्ये तीन दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना लागली. यानंतर काल रात्री या घराला घेरण्यात आले असून दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाल्याचे वृत्त आहे. भारतीय जवानांनी काही दिवसांपूर्वीच कुलगाममध्ये याच प्रकारे एका घरात दडून बसलेल्या तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले होते. तेव्हा काही तासांच्या चकमकीनंतर अतिरेकी दडून बसलेले घर स्फोटकांनी उडविण्यात आले होते. याच प्रकारची कारवाई शोपियातदेखील करण्यात येईल अशी शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound