चाळीसगाव (प्रतिनिधी)। चाळीसगाव बसस्थानकाचे दुरुस्ती कामकाज होऊन महिने उलटले, मात्र आजही प्रवासी अनेक समस्यांना तोंड देत आहेत, असे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सोनल साळुंखे यांनी सांगितले. चाळीसगाव आगार प्रमुख यांची भेट घेऊन बस स्थानकातील महत्वाच्या समस्यांविषयी चर्चा करून निवेदन दिले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
नियमित येणाऱ्या जाणाऱ्या बसेसचे वेळापत्रक नाही कोणती बस कोणत्या प्लँटफॉर्मवर लागेल. यासाठी रुटबोर्ड नाहीत, यामुळे प्रवासी, महिला तसेच वृद्ध नागरिकांची स्थानकात धावपळ होताना दिसते. त्यातच, लग्नसराई, शाळा, महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षा त्यामुळे होणारी धावपळ, प्रचंड गर्दीमुळे स्थानकातील नियोजनाचा अभाव दिसून आला. बसस्थानकात प्रवाश्यांसाठी स्वच्छ शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही, तसेच किरकोळ विक्री वस्तू किंवा खाद्यपदार्थ विक्रीसाठी जे विक्रेते आहेत ते परवानाधारक असले पाहिजेत, ड्रेस कोड नसल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रात्री 9 नंतर महिला बस स्थानकात येऊ शकत नाही, अशी दिसून आले. दारुडे – नशा करणारे यांचे बसण्याचे निवांत ठिकाण बसस्थानक बनलेले दिसून आले. तालुक्यातील रस्त्यांची अवस्था खूप खराब असल्या कारणाने येत्या काही दिवसात जे रस्ते खराब आहेत त्या बसेस बंद करण्यात येऊ शकतील, असे ही आगार व्यवस्थापक संदीप निकम यांनी सांगितले. वरील सर्व गोष्टीवर चर्चा करून येत्या आठ दिवसात जर योग्य उपाययोजना झाली नाही, तर बसस्थानकात प्रवाश्यांसोबत ठिय्या आंदोलनास राष्ट्रवादी महिला काँगेस पार्टी तयार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सोनल साळुंखे, शहराध्यक्षा प्रतिभा पाटील, तालुका उपाध्यक्षा अनिता शर्मा, युवती अध्यक्षा हेमांगी शर्मा, ज्योती मराठे, कमल मराठे, सुजित पाटील, पिनू सोनवणे, पंजाबराव देशमुख, गुंजन मोटे, सौरभ त्रिभुवन, संकेत देशमुख, पवन महाजन, राकेश ठाकूर, भूषण पाटील, सागर अहिरे, अक्षय साळुंखे, पंकज देशमुख, श्रीमंत देवकर, राहुल काकडे, राकेश मोरे हे उपस्थित होते.