सावदा ता.रावेर प्रतिनिधी । शहरातील गवत बाजार परिसरात राहणाऱ्या अंदाजे ६५ वर्षीय महिलाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. शहरात कोरोनाबाधित एकुण संख्या सहा झाली असून गवत बाजार परिसर सील करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. आत्तापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा ४७५ वर पोहचला आहे. सावद्यातील गवत बाजार परिसरात राहणाऱ्या वयोवृध्द महिलेला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना जिल्हा कोविड रूग्णालयात उपचारार्थ दाखल करून स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज दुपारी कोरोना रिपार्ट पॉझिटीव्ह आला असून त्यांच्या संपर्कातील सहा जणांना क्वारंटाईन केला आहे. यावेळी तालुका प्रशासन, पोलीस अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी गवत बाजार परिसरात दाखल होवून संपुर्ण परिसर सील करण्यात आले आहे. अशी माहिती मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजशी बोलतांना सांगितले.