एरंडोल पोलीस स्टेशनतर्फे १०१ मुस्लिम गरजू कुटुंबांना शीरखुर्माचे साहित्य वाटप

एरंडोल, प्रतिनिधी । पोलीस स्टेशनतर्फे पवित्र रमजान महिन्यानिमित्त शहरातील १०१ मुस्लिम गरजु कुटुंबीयांना शीरखुर्माचे साहित्य वाटप करण्यात आले.

आज सोमवार दि. २५ मे रोजी रमजान ईद लक्षात घेता एरंडोल चे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी शहरातील गरिब गरजवंत अशा १०१ कुटुंबीयांना शीरखुर्मा साहित्याचे वाटप शहरातील अनेक भागांमध्ये मान्यवरांच्या हस्ते वाटप केले. यात अपंग,विधवा, गरीब,वयस्कर अशा नागरिकांना वाटप करण्यात आले.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे , सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे ,पोलीस उपनिरीक्षक दहिफळे , नगरसेवक जहिरोद्दीन शेख कासम, नगरसेवक असलम पिंजारी, नगरसेवक शकूर मोमिन ,आशपाक बागवान,सामाजिक कार्यकर्ते जावेद मुजावर, अॅड. अहमद सय्यद ,अल्ताफ पठाण , शेख सलीम शेख वजीर , साबीर मुजावर, सादिक मुजावर या समाजातील मान्यवरांच्या सोबत साहित्य वाटप करण्यात आले.

Protected Content