Home आरोग्य चिंताजनक : चोपड्यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

चिंताजनक : चोपड्यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले


चोपडा प्रतिनिधी । शहरातील तीन रुग्ण कोरोनाबधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. संबंधित रुग्णांच्या संपर्कातील इतर नातेवाईकांना क्वारंटाईन करण्याचे काम आरोग्य यंत्रणा करीत आहे.

शहरातील कोष्टी गल्लीतील रहिवाशी असलेल्या ७५ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे पुणे येथे मृत्यू झाला होता. त्याच्या संपर्कातील कोष्टी गल्लीतील ४७ वर्षीय महिला व २० वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढलेला आहे तर केजीएन कॉलनीतील नाशिक येथे उपचार घेत असलेला पुरुष कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने त्याच्या परिवारातील १९ वर्षीय  महिला देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. अद्याप २१ अहवालांची प्रतीक्षा असून चोपडा तालुक्यावरील चिंता अजून कायम आहे.


Protected Content

Play sound