जळगाव प्रतिनिधी । रात्री उशीरा खासगी प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये पाच रूग्ण पॉझिटीव्ह आढळले असून यामुळे आता जिल्ह्यातील बाधीत रूग्णांची संख्या ४५० इतकी झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव शहरातील जिल्हा पेठेतील एक व ईश्वर काॅलनीतील एका व्यक्तीचा तर भुसावळ येथील ३ व्यक्तीचा समावेश.
भुसावळमधील पाॅझिटिव्ह आढळलेल्या तीनपैकी दोन व्यक्ती डाॅक्टर आहेत. जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४५० झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. दररोज रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. बहुतांश रूग्णांची तपासणी ही शासकीय प्रयोगशाळेतून होत असते. तथापि, काही जण खासगी लॅबमधून तपासणी करत असतात. याच प्रकारात तपासणी केलेल्यांमधील हे पाच रूग्ण पॉझिटीव्ह असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने रात्री उशीरा प्रेस नोटच्या माध्यमातून जाहीर केली आहे.