eid mubarak
जळगाव, सामाजिक

चंद्र दर्शन न झाल्याने ईद सोमवारी साजरी होणार

शेअर करा !

जळगाव रूहते हिलाल कमिटीची सभा ईद गाह च्या सभागृहात ‘शहर-ए-काज़ी’ मुफ़्ती अतीकुर्रहमान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यात जळगावात अथवा इतरत्र कोठेही चंद्रदर्शन न झाल्याने ईदची नमाज सोमवारी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

kirana

रविवारची ईद होईल का म्हणून पाहणी करण्यात आली म्हणून रूहते हीलाल कमिटीची सभा घेण्यात आली. सर्व प्रथम इदगाह ट्रस्टचे सचिव फारुक शेख यांनी उपस्थित सर्व आलिम, उलेमा व मौलाना यांचे स्वागत करून उपस्थितांना त्यांचा परिचय करून दिला. ट्रस्टचे अध्यक्ष अल्हाज अब्दुल गफ्फार मलिक यांनी प्रास्ताविक सादर केले. मुफ़्ती अतिकउर रहमान शहरे काजी, यांनी मार्गदर्शन केले व ईद सोमवारी होईल असे घोषित केले.

रूहते हिलाल समिती व इदगाह ट्रस्टचे आवाहन हिलाल समितीचे सर्व व सन्माननीय उलमा, अलीम व मौलाना मुफ्ती अतीकुर्रहमान तसेच ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक व सचिव फारुक शेख यांनी मुस्लीम समुदायांना आव्हान केले आहे की की नमाज आपापल्या घरिच अदा करावी, कोणीही ही ईद गाह मध्ये येता कामा नये तसेच कोणीही रस्त्यावर येऊन ईद मुबारक साठी गर्दी करू नये एकमेकास गळाभेट अथवा हस्तांदोलन (मुसाफा) घेऊ नये आपली स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी व अल्लाकडे एकच प्रार्थना करावी की आम्हाला व विश्वातील संपूर्ण मानव जातीला या कोरोना व्हायरस पासून मुक्ती दे व या कोरोनाव्हायरस चा नायनाट कर.

मुफ़्ती अबुजर, मुफ़्ती हंजला, मुफ़्ती अबुजर,मौलाना नदीम अख्तर, मौलाना हाफिज जाहिद, कारी अशफाक,मौलाना रेहान,मौलाना जुबेर,मौलाना शाकिर,मुफ़्ती रेहान,मुफ़्ती हंजला, मौलाना वसीम पटेल,मौलाना नासिर,मौलाना शाकिर अली, ट्रस्टचे अनिस शाह, मजहर नजीर मुलतान,रियाज़ मिर्ज़ा, ताहेर शेख, याकूब खाटीक तसेच सय्यद चाँद, वहाब मालिक,इक़बाल वजीर,शकील सर,अज़ीज़ हामिद,कुद्दुस शेख,तय्यब शेख,शाकिर मुलतानी, शाहिद सैय्यद,ज़ाकिर बागवान यांची विशेष उपस्थिती होती