yawa11
यावल, राजकीय

“उद्धवा… अजब तुझे निष्फळ सरकार” म्हणत भाजपातर्फे राज्य सरकारचा निषेध

शेअर करा !

यावल, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे राज्य सरकारचा निषेध करून, सरकारला जाब विचारण्यासाठी लॉकडाऊनचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून भारतीय जनता पार्टीतर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले.

राज्यातील महा विकास आघाडी सरकार विरोधात आज भारतीय जनता पार्टी च्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंगण ते रणांगण अशा शिर्षकाखाली राज्यातील अनेक भाजपा नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. राज्यात कोरोना संक्रमितांची दिवसेंदिवस वाढती संख्या, आरोग्य व्यवस्थेचा उडलेला बोजावारा, कापूस उत्पादकांना योग्य तो दर दिला जावा असे मजकूर असलेले फलक हातात घेवून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राज्य शासनाचा निषेध केला. भाजपा तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे, यांच्या नेतृत्वाखाली येथे आज आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष निलेश गडे, माजी यावल भाजपा शहराध्यक्ष हेमराज फेगडे, भाजपा नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, व्यंकटेश बारी, माजी.भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष,रितेश बारी,भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष,स्नेहल फिरके, प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

kirana