sanjay raut 3
राजकीय, राज्य

मला तर आज आकाशात काळे कावळेसुद्धा दिसले नाहीत ; राऊत यांचा भाजपला टोला

शेअर करा !

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे आजचे आंदोलन पूर्णत: फसलेले आहे. हे फक्त भाजप नेत्यांचे आंदोलन होते. जनता यात सामील झाली नाही. मला तर आज आकाशात काळे कावळेसुद्धा दिसले नाहीत, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत भाजपवर टीका केली आहे.

kirana

 

राऊत पुढे म्हणाले की, कोरोना व्हायरसशी लढण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याचा आरोप करत भाजप काळे आंदोलन करत आहे. विरोधी पक्ष म्हणून भाजप अपयशी ठरल्यामुळे ते हे आंदोलन करत आहेत. आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. आंदोलन अपयशी ठरल्यामुळे त्यांचा जळफळाट झाल्याने ते टीका करत असल्याचे संजय राऊत म्हणाले.